शिक्षक दिनानिमित्त अमोल शिंदे यांचे अनोखे आवाहन

शिक्षक दिनानिमित्त अमोल शिंदे यांचे अनोखे आवाहन

———————————————————–
आपल्या शिक्षकांना फोन करून धन्यवाद गुरुजी (सर) बोलुन शुभेच्छा देण्याचे केले आवाहन

पाचोरा
येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूकप्रमुख अमोल शिंदे यांनी आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आपल्याला एक उत्तम व्यक्ती घडविणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी आजच्या या धकाधकीच्या जीवनात नोकरी व व्यवसायानिमित्त आपण गाव व परिसर सोडून इतरत्र रहीवासास असतो.त्यामुळे आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षकांना फोन करून कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद गुरुजी (सर) हे बोलून आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊया असे आवाहन एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
आज आयुष्यात विविध वळणावर आपण उत्तम व्यक्ती म्हणुन जीवन जगत आहोत.कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनियर तर,कुणी वकील,कलाकार,व्यवसाय किंवा कुणी जॉब करत आहेत आणि कुणी उत्तम गृहिणी सुद्धा आहेत.या पदांवर काम करत असतांना आपल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणुन घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबतच आपले गुरुजी म्हणजेच आपले शिक्षक यांनी सुद्धा मेहनत घेतली आहे.कारण समाजात जगत असतांना आपण जे काही करत आहोत ते त्यांच्याच मुळे आणि जे काही करू शकत आहोत ते देखील त्यांच्याच मुळे आज ज्या उंचीवर पोहचलो आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्याच मुळे यासाठी आपल्या घवविणाऱ्या आपल्या शिक्षकांचे ऋण फेडण्यासाठी आपण त्यांना या शिक्षक दिनी शुभेच्छा देण्यासाठी एक फोन करून धन्यवाद गुरुजी (सर) बोलूयात असे आवाहन केले असुन मी स्वतः तर करणार आहे आपण देखील करा असे आवाहन देखील अमोल शिंदे यांनी यावेळी सदर व्हिडिओ च्या माध्यमातून आज केले आहे.