पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे तंटामुक्ती गाव समिती गठित! अध्यक्षपदी अशोक पितांबर पाटील यांची निवड

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे तंटामुक्ती गाव समिती गठित! अध्यक्षपदी अशोक पितांबर पाटील यांची निवड

अवैध गावठी व देशी दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही-तंटामुक्ती अध्यक्ष

दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी खेडगाव नंदीचे गावातील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते तंटामुक्ती गाव समितीची रचना करण्यात आली असून सदर ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्य दीपक विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या ठिकाणी गावातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून खेडगाव नंदीचे गावातील विविध समस्या त्याचबरोबर येणाऱ्या पुढील महिन्यात पोळा या सणानिमित्त मोठ्या स्वरूपात यात्रा उत्सव या ठिकाणी होतो त्या अनुषंगाने एका प्रभावशाली तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आल्याचे समजते.

सदर खेडगाव नंदीचे गावात ठिकठिकाणी गावठी तसेच अवैध देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या गावठी दारूमुळे गावात अनेक निष्पाप बळी गेले असून सदर गावठी दारू तसेच विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही तसेच लवकरच या गावठी दारू विकणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ काढून पाचोरा येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना देणार त्याचबरोबर दारूबंदी विभागाला कलम कायदा ९३ प्रमाणे कारवाई करण्यासाठी या स्वरूपाचे पत्र नवनियुक्त अध्यक्ष अशोक पितांबर पाटील यांच्याकडून देण्यात येणार असे पत्रकारांना सांगण्यात आले.

या समितीमध्ये अध्यक्षपदाचे धुरा अशोक पितांबर पाटील तर सन्माननीय सदस्य म्हणून सरपंच स्वाती कैलास कुमावत त्याचबरोबर उपसरपंच अनिता अभिमान बाविस्कर, कैलास रायसिंग पाटील, अजय अभिमान पाटील,अनिल पांडुरंग ढमाले, सचिन प्रेमराज पाटील, दत्तात्रय सिताराम ढमाले, प्रेमराज नारायण पाटील,भिकन तोताराम काटकर, शंकर सुरेश ढमाले, संदीप सुभाषचंद संघवी, दीपक विश्वनाथ पाटील, अजय गणेश पाटील तसेच समितीचे सचिव म्हणून गावाचे पोलीस पाटील उर्मिलाबाई चंद्रशेखर पाटील तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे बिट हवलदार निलेश गायकवाड यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे!

या ठिकाणी नंदकिशोर सोसायटीचे सचिव गोरख नेरपगार, त्याचबरोबर ग्रामसेवक आबा हरी पाटील व पोलीस पाटील पती चंद्रशेखर पाटील व गावातील युवक व ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.