मला माझ्या बापाच्या हातातील उस तोडणारा कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचे होतं : उपअधीक्षक संतोष खाडे

मला माझ्या बापाच्या हातातील उस तोडणारा कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचे होतं : उपअधीक्षक संतोष खाडे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) मला माझ्या बापाच्या हातातील उस तोडणारा कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचे होतं असा संदेश अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन नंबर धंदेवाल्यांचा कर्दनकाळ असलेले पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे साहेब यांनी दिला. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने राजयोग मंगल कार्यालयात शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ढोले सर हे होते.उपअधिक्षक संतोष खाडे साहेब पुढे म्हणाले की पहीली ते बारावी पर्यंतचा अभ्यास म्हणजेच एम पी एस सी चा अभ्यास होय.अत्यंत वाईट परीस्थिती आणि संकटाच्या काळात जो टीकतो तोच पुढे विजेता होतो.स्पर्धा परीक्षेचे तिनं टप्पे असतात.माझे एम पी एस सी चे ध्येय असे होते की माझ्या वडीलांच्या हातातील कोयता बंद करायचे स्वप्न होते. माझे आई वडील सारखे म्हणायचे की तुला यायचं तर लाल दिव्याच्या गाडीतूनच यायचयं आणि त्यांचे स्वप्न मी पुर्ण केले.ज्या दिवशी मी माझ्या आई वडिलांच्या हातातील कोयता बंद केला त्या दिवशी जिवनातील सर्वात अत्यंत मोठा आनंद मला झाला.तुम्हीही एखादं स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा आणि आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा असे खाडे साहेब यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जिवनातील अनेक कडु गोड आठवणींचे पैलू सांगून विद्यार्थ्यांनाच्या तोंडून चांगले वागण्याचे तत्त्वे वदवून घेतले.प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी मीरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, राजयोग मंगल कार्यालयाचे मालक विजय कोरडे, विखे परीवाराचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजू मामा तागड,माजी प्राचार्य दाणी सर, आर एस एस चे सोमनाथ झाडे, बाळासाहेब लोंढे, संभाजी दारकुंडे, पर्यवेक्षक कटके सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदराज कुटे पाटील, अतिथी हॉटेलचे संचालक निलेश महानोर,मयुर तागड, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंगल कार्यालय खचाखच भरलेले होते.जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संतोष खाडे साहेब यांच्या धडाकेबाज कामगिरी मुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राहीलेले गोवा, मावा, गुटखा, मटका, जुगार, गांजा, अवैध दारू विक्री, आणि ईतर दोन नंबर धंद्यावाल्यांना निट करण्याचे आश्वासन खाडे साहेबांनी पत्रकारांना दिले.दोन दिवसांपूर्वी मीरी येथे अवैध धंद्यावर साहेबांनी धाडी टाकल्या होत्या या पार्श्वभूमीवर मीरी जिल्हा परिषद गटातील दोन नंबर धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.त्या अनुषंगाने सर्व धाबे वाल्यांची एक गुपचूप बैठक घेऊन त्यांनी आपल्या धंद्याच्या पुढील वाटचालीवर चर्चा केली.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी दोन नंबर धंद्यावाल्यांची माहिती एका क्यु आर कोड द्वारे फाॅर्म भरून पोलिस प्रशासनाला कळवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसणार आहे.असे पोलीसांचे म्हणणे आहे.