12 सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना तर्फे जेलभरो आंदोलन

12 सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना यांचं जेलभरो आंदोलन

दिनांक 12 सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे जेलभरो आंदोलन भिवंडी बायपास ठाणे येथून होणार असून सर्व कर्मचारी वर्गाने सर्व मतभेद व गट तट बाजूला ठेवून एकसंघतेने आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती कर्मचारी संघटने मार्फत करण्यात येत आहे
राज्यात एकूण 2388 वसतिगृहे असून सर्व वसतिगृह ही अनुदानित असून 100% अनुदानावर असून कर्मचारी मात्र मानधन तत्वावर आहे आणि तेही तुटपुंजे मानधन असून या महागाई च्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे वसतिगृहातील अधीक्षक-10000/-,स्वयंपाकी-8500/-,मदतनीस-7500/-,चौकीदार-7500/- असे मानधन आहे राज्यात अनेक सरकार आली व गेली परंतु केवळ आश्वासन पलीकडे काहीच मिळाले नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारले आहे
राज्य शासनाचे वसतिगृह कर्मचारी , आश्रम शाळा येथील वसतिगृह कर्मचारी तसेच आदिवासी विकास विभाग येथील आश्रम शाळा वसतिगृह कर्मचारी यांना वेतनश्रेणी असून सामाजिक न्याय विभाग विभाग अंतर्गत येतात त्यांना वेतनश्रेणी व अनुदानित वसतिगृह कर्मचारी यांना मानधन ही दुजाभाव करण्याची संकल्पना शासनाची असून याबाबत आंदोलन पुकारले असून सर्व कर्मचारी यांनी जातीने हजर राहावे असे आवाहन कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले.