विज वितरण कंपनीच्या संपाला पाचोरा कॉंग्रेसचा पाठींबा

विज वितरण कंपनीच्या संपाला पाचोरा कॉंग्रेसचा पाठींबा

पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत कामगारांच्या संपाला कॉंग्रेस चे आ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा कॉंग्रेस ने पाठींबा दिला.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघर्ष समिति ने राज्यभर संप पुकारला होता. या संपातील प्रमुख मागणी खाजगीकरण विरोध हा असुन महावितरणात अदानी ला सहभागी होवु देवु नये २०१९ नंतर चे उपकेंद्र कंपनी मार्फत चालवा अशा मागण्या घेऊन संप पुकारण्यात आला होता. या संपाला कॉंग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट दिली. यावेळी पदविधर मतदार संघाचे आ. सुधिर तांबे, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, प्रवीण पाटील, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, मनोज पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,आदी उपस्थित होते. यावेळी संपकरी कामगार समोर आ. सुधीर तांबे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आज जरी अंधार होईल मात्र महावितरण चे भविष्य प्रकाशमय राहणार आहे त्यामुळे कामगारांना सोबत जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल मात्र अदानी ला कदापी घेउ देणार नाही असे शेवटी सांगितले.