वि.का.सोसायट्यांमध्ये बांबरुड-कुरंगी गटांत देखील शिवसेना-राष्ट्रवादीला जोरदार धक्का
———————————————————–
वेरुळी खु.-वडगाव टेक आणि आसनखेडा जिंकत तालुक्यात भाजपाचा विजयी रथ सुसाट
पाचोरा-
नगरदेवळा-बाळद गटा पाठोपाठ आता भाजपाने आपला मोर्चा बांबरुड-कुरंगी गटात वळवला असुन येथील देखील एक-एक विविध कार्यकारी सोसायट्या सर करण्यास भारतीय जनता पार्टीने सुरुवात केल्याचे दिसत आहे.नुकत्याच झालेल्या वेरुळी खु.-वडगांव टेक आणि आसनखेडा खु.सोसायटी मध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळवत शिवसेना व राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला आहे.
वेरुळी खु.-वडगांव टेक येथे शिवसेना प्रणित सहकार पॅनल विरुद्ध भाजपाच्या शेतकरी विकास पॅनल मध्ये यावेळी जोरदार लढत झाली.प्रत्यक्ष ११ जागांसाठी झालेल्या या चुरशीच्या निवडणूकीत भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलने १० जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला असुन वेरुळी खु.-वडगांव टेक वि.का.सोसा.मध्ये निवडुन आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
सर्वसाधारण मतदारसंघातून
१) अनिल दत्तात्रय पाटील-१२०
२) गोपीचंद तुकाराम पाटील-१०२
३)गणेश गोरख सोनार-१०७
४)गोविंदा परशुराम पाटील-११०
५) हंसराज हेमराज पाटील-१०१
६)अर्जुन भास्कर पाटील-९७
७)भगवान पंडीत पाटील-९६
महिला राखीव मतदार संघातून
१) पुष्पाबाई राजेंद्र पाटील-११७ २)सुमनबाई पितांबर पाटील-१११
इतर मागासवर्गीय मतदारसंघातून
१)योगीराज पांडुरंग पाटील-१०४
वेरुळी-वडगांव टेक या वि.का.सोसायटीच्या विजयासाठी पॅनल प्रमुख योगीराज पाटील अनिल पाटील हंसराज पाटील यांच्यासह गोपाल देसले,अमोल पाटील,सचिन सोनवणे,सचिन पाटील,राजेंद्र देसले,संदीप रणदिवे,श्रीराम रणदिवे,नितीन रणदिवे,देविदास महाजन व गावांतील इतर तरुण,जेष्ठ नागरिक,महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
त्याच प्रमाणे आसनखेडा खु. येथील विविध कार्यकारी सोसायटीत देखील शिवसेना-राष्ट्रवादी-कांग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या पॅनल ला धूळ चारत भाजपा प्रणित पॅनल ने सर्वच्या सर्व १२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला असुन आसनखेडा खु. वि.का.सोसा.मध्ये निवडुन आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
सर्वसाधारण मतदारसंघातून
१) रवींद्र महारु पाटील -१०९
२) रवींद्र शिवाजी पाटील-१०९ ३) आबा अंकुश पाटील-१०८
४) अरुणाबाई देवीदास
पवार-१०८
५) श्यामराव वामन पाटील-१०५ ६) अशोक पुरुषोत्तम पाटील-१०२
७) केवळबाई सखाराम पाटील-१०२
८) अभिमन रामचंद्र पाटील-१००
महिला राखीव मतदार संघातून
१)सुनंदाबाई रघुनाथ पाटील-१०९
२)प्रमिला पांडुरंग पाटील-१०५
इतर मागासवर्गीय मतदारसंघातून
१) रतन रामा पाटील-१०९
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून
१) सुमनबाई सयाजी गायकवाड-११०
आसनखेडा खु. वि.का.सोसायटीच्या विजयासाठी पॅनल प्रमुख आबा पाटील,यांच्यासह शिवाजी पाटील,सुरेश पाटील,प्रल्हाद पाटील,देविदास पाटील,पांडुरंग पाटील तसेच गावांतील तरुण,जेष्ठ नागरिक,महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
वेरुळी खु.-वडगांव टेक आणि आसनखेडा खु.येथील नवनिर्वाचित विकास संचालकांशी संवाद साधला असता हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे.तसेच येणाऱ्या काळांत वि.का.सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.
तसेच विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी बांबरुड-कुरंगी गट ताब्यात घेण्यासाठी एका प्रकारे मोर्चे बांधणी सुरू असुन भारतीय जनता पार्टीने ही सर्व गावे जी एकेकाळी शिवसेना व राष्ट्रवादीचा बालेकिल्ले म्ह्णून ओळखली जात होती.तीच गावे सर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रमाणात यश ह्या गटांत मिळु शकते अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.