‘ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण पुरक जीवनशैली’ या विषयावर पाचोरा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

‘ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण पुरक जीवनशैली’ या विषयावर पाचोरा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

पाचोरा दि. 16 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यायाच्या IQAC व भूगोल विभागाच्या वतीने “ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण पूरक जीवनशैली” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी भूषवले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, ऊर्जा स्रोत जर टिकवले नाही, तर पुढील पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. उर्जेच्या संवर्धनासाठी आजच्या पिढीने बेफिकीर वागून चालणार नाही. ऊर्जा संवर्धन काळाची गरण आहे त्यासाठी नवीन पिढीने कार्यक्षम होऊन संशोधन करणे गरजेचे आहे असा विचार व्यक्त केला.
कार्यशाळेचे प्रमुख वक्ते भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख मा. प्रा. एस. टी. सूर्यवंशी म्हणाले की, वातावरणाचा जीवनशैलीवर फार मोठा परिणाम होत असतो, जीवनशैली टिकवण्यासाठी पर्यावरणामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. मानव ऊर्जेचा वापर आपल्या स्वार्थासाठी बरोबर करतो. आज पर्यावरण व ऊर्जा संवर्धनासाठी शासन स्तरावर अनेक कायदे केले आहेत. त्याची अंमलबजावणी करून पर्यावरण पूरक जीवनशैली टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करणे गरजेचे आहे. असा विचार व्यक्त केला.
यावेळी ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. बालाजी पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, श्री. नदीम देशमुख, प्राध्यापक-प्राध्यापिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. आर. बी. वळवी तर आभार प्रदर्शन प्रा. शुभम राजपूत यांनी केले.