लोहारा येथे रोजच वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांत संताप

लोहारा येथे रोजच वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांत संताप.

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मर ओव्हरलोड होत असल्याने वीजप्रवाह वारंवार खंडीत होत असल्यामुळे येथील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवून लोहारा गावठाण फिडर स्वतंत्र करावे अशी मागणी येथील व्यापारी व त्रस्त विजग्राहकांनी केली आहे. लोहारा ३३/११ के.व्ही. सबस्टेशन मधील वीजपुरवठा कृषी आणि गावठाण अशा दोन फीडर मध्ये विभागला असून ,गावठाण फिडरवर लोहारा, कळमसरा, म्हसास, शहापुरा, कासमपुरा, लाख, रा मेश्वर तांडा ही गावे येत असून, त्या फिडरवर ओव्हरलोड झाल्याने दररोज सकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत वीजप्रवाह खंडित होऊन गाव अंधारात असते. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल होतात व विद्यार्थ्यांना ही त्याचा फटका बसतो. त्यामुळे लोहारा फीडर स्वतंत्र करावे .त्यामुळे त्या फीडरवरील लोड कमी होऊन इतर गावांचाही वीज पुरवठा सुरळीत होऊ शकतो. तसेच लोहारा, कासमपुरा, कळमसरा, म्हसास, शहापुरा, लाख तांडा, रामेश्वर तांडा या सर्व गावांचे कृषी पंपांसह गावातील घरांचे कनेक्शन व ग्रामपंचायतींची स्ट्रीट लाईट तसेच सर्व गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे विद्युत पंप असा खूप मोठा लोड येथील सबस्टेशनवर येत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कृषी पंप धारक शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांमध्ये महावितरण कंपनी बाबत तीव्र नाराजी पसरली आहे. लोहारा येथील सबस्टेशन मधील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवून मिळावी अशी मागणी लोहारा व परिसरातील वीज ग्राहकांनी केली आहे. तरी संबंधित अधिकारी यांनी तातडीने या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन लोहारा आणि परिसरातील नागरिकांना होणारा नित्याचा त्रास थांबवावा,अशी मागणी जोर धरत आहे.