पाचोरा शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला
प्रतिनिधी पाचोरा दि 17/02/2025 रोजी रात्री 2 ते 3 सुमारास पाचोरा शहरातील गोड वस्ती जवळ दोन मोटरसायकल सवार यांचा अपघात झाला यात ते जबरी जखमी झाल्यानंतर पाचोरा शहर प्रमुख शिवसेना सुमित सावंत व त्यांचे सहकारी यांनी त्या दोन जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध न होते तत्काळ उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने त्या दोन रुग्णांवर उच्चार होत नव्हते शहर प्रमुख सुमित सावंत यांनी रात्री उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर तब्बल एक ते दीड तासानंतर उपचारासाठी डॉक्टर आले इमर्जन्सी मध्ये ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता रात्रीच्या वेळेस दवाखान्यात डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांनी कोणाच्या भरोशावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात यावं याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी लक्ष दिल्यामुळे दोन रुग्णांचे जीवनदान दिले.