विसर्जनासाठी गणेशाची मूर्ती द्या:गणेशाची स्मृती म्हणून रोप भेट घ्या

विसर्जनासाठी गणेशाची मूर्ती द्या:गणेशाची स्मृती म्हणून रोप भेट घ्या

उपक्रमाचे दुसरे वर्ष

भुसावळ नगरपरिषद भुसावळ व पर्यावरण जागर प्रतिष्ठान चा उपक्रम
भुसावळ- येथील भुसावळ नगरपरिषद व पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेश मंडळाचे विसर्जन करणारे व विविध मंडळातील गणेश विसर्जन करणारे गणेश भक्त यांना विसर्जनासाठी मूर्ती घेऊन त्या गणेशाचं स्मृती जतन राहावी म्हणून हा भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण जागा प्रतिष्ठान चे नाना पाटील सर यांनी मागील वर्षापासून नवीन संकल्पना राबवत गणेश विसर्जनाच्या मूर्तीच्या बदल्यात गणेश भक्तांना प्रसाद रूपाने गणेशाच्या स्मृतीरूपाने झाडे भेट देऊन ते झाड संगोपन आणि संवर्धन करून जतन करतील ही भावनिक जोड देण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून उपक्रमातून करण्याचा प्रयत्न आहे .मागील वर्षी 255 मूर्तींच्या बदल्यात 230 फळांची झाडे भेट दिली होती . ज्यांना झाड दिली त्यांची नोंद ठेवलेली होती त्यामध्ये भेटी सुद्धा देण्यात आल्या यातून 175 झाड या उपक्रमातून जगलेली आहेत हे फलित पाहून नगरपरिषद भुसावळ व पर्यावरण जागर प्रतिष्ठान व ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर यांच्या संकल्पनेनुसार यावर्षी देखील गणेश भक्तांना मूर्ती द्या व भेट स्वरूपात वृक्ष घ्या व त्याचे जतन संवर्धन करा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीजवळ व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी मूर्ती देऊन निर्माल्य ठरलेल्या ठिकाणी जमा करून वृक्ष भेट म्हणून घेऊन जावे व ते गणेशाच्या स्मृती रूपाने जगवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माननीय मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ब्रॅण्ड अम्बेसेडर नाना पाटील सर यांनी केले आहे .या उपक्रमासाठी उपमुख्य अधिकारी लोकेश ढाके, कक्ष अधिकारी नितीन लुंजे,गौरव अहिरे, इंजिनिअर महेश चौधरी ,वैभव पवार,सुरेंद्र सिंग पाटील हे सहकार्य करीत आहे .
तरी नागरिकांनी व गणेश भक्तांनी आपल्या नावाची व मोबाईल ची नोंद करून गणेश रुपी स्मृती चे रोप घेऊन जावे असे आवाहन संयोजन समिती कडून केले आहे