जिल्हा परिषद उर्दू शाळा तर्फे गटशिक्षण अधिकारी यांचे सत्कार

जिल्हा परिषद उर्दू शाळा तर्फे गटशिक्षण अधिकारी यांचे सत्कार

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा यांच्यातर्फे नव नियुक्त गटशिक्षणाधिकारी पाचोरा पंचायत समिती मा.समाधान पाटील यांचे सत्कार करण्यात आले. या वेळी समाधान पाटील यांनी सकाळी शाळेला भेट दिली. शुक्रवार रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी साहेब यांचे अध्यक्ष खाली झालेली मीटिंगमध्ये मिळालेले आदेशानुसार त्यांनी तालुक्यातील शाळांना भेट देण्याची सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणूक पुढे असून ज्या शिक्षकांना BLO ची जिम्मेदारी मिळालेली आहे त्यांनी काटेकोरपणे आपले कार्य करावे,तसेच शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शालेय परिसर, शाळेतील सर्व रेकॉर्ड यांची पाहणी केली. शिक्षकांची समस्यांना तोडगा लावून त्यांचे मार्गदर्शनही केले. शासन कडून स्कूल संबंधी अडकलेले कामांना मार्ग लावण्याचे आश्वासन हि दिले. यावेळी शाळेमार्फत त्यांचे गट शिक्षण अधिकारी बनल्याने सत्कार करण्यात आले. यावेळी गोरडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदिर, मुख्याध्यापक अब्दुल एजाज, पदवीधर शिक्षक सलाउद्दीन शेख, खिजरोद्दिनन शेख, शाहेदा हारून, नसीम खाटिक, शाहीन शेख,सुमयया देशमुख,शिक्षक सेना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख जावेद रहिम उपस्थित होते.