भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत लाडकुबाई विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय,गोंडगावच्या संघास विजेतेपद

_भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत लाडकुबाई विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय,गोंडगावच्या संघास विजेतेपद....!!!!_

भडगाव -क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने सौ.रजनीताई देशमुख,कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धा खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात लाडकुबाई विद्यामंदिर,भडगावच्या संघाने जवाहर हायस्कूल,गिरड विरुध्द विजय मिळवला,गिरड संघ उपविजयी ठरला.तर १७ वर्षाआतील मुलांच्या गटात माध्यमिक विद्यालय गोंडगावच्या संघाने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अँग्लो उर्दू हायस्कूल,भडगाव संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तर याच गटात माध्यमिक विद्यामंदिर,पळासखेडे हा संघ तृतीय स्थानी राहिला.
स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघाचे कौतुक सौ.रजनीताई देशमुख,महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश तांदळे,प्रा.डॉ.दिनेश मराठे,प्रा.डॉ.अतुल देशमुख,स्वप्निल परदेशी,ललीत अहिरे,रविंद्र वाडेकर यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,डी.एस.पाटील,अमीत पाटील,रहिम बागवान,सुभाष चौधरी,एन.एस.पाटील,प्रशांत सोळुंखे,अजहर शेख आदिंनी मेहनत घेतली,स्पर्धेस पंच म्हणून राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयाचे खेळाडू शुभम निकुंभ,हर्षल पाटील,तेजस पाटील,रवि काळे,जगदीश पाटील,ज्योती पाटील,विद्या महाले आदिंनी मेहनत घेतली.