पाचोरा तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

पाचोरा तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

 

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे शालेय बुद्धीबळ 14 /17/19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या बुद्धिबळ या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.अर्चना पाटील संचालिका पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटना यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास श्री.गो.से.हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ , उपमुख्याध्यापक एन.आर.पाटील.उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना खेळीमेळीच्या वातावरणात खेळावे असे सांगितले तसेच एन.आर पाटील आपल्या भाषणात खेळांचे नियम व बुद्धिबळ खेळ कसा खेळावा याचे मार्गदर्शन केले. परेश देशपांडे यांनी मुख्य पंच म्हणून स्पर्धेचे काम पाहिले.
जेष्ठ क्रीडा शिक्षक संजय करंदे व महेश चिंचोले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
*बक्षीस वितरणाचा कार्यक्रम* भाईसो.श्री.दुष्यंतजी रावल अध्यक्ष पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटन व सुरज वाघ उपाध्यक्ष पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटना तथा युवा उद्योजक, डॉ.सौ.अर्चना पाटील संचालिका पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटना यांच्या हस्ते करण्यात आला. भाईसो. श्री.दुष्यंतजी रावल यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, नॅशनलसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा.श्री. गिरीश पाटील सर उपस्थित होते.
*14 वर्षे आतील मुली* १) ऋतुजा बालपांडे , २) चेतना सोनवणे (श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा) ३) श्रेया महालपुरे (निर्मल इंटरनॅशनल) ४) श्रावणी संतोष अलाहित ( गुरुकुल इंग्लिश मीडियम) ५) देवश्री देशमुख ( कै.पी.के.शिंदे माध्य. विद्यालय)
*14 वर्षे आतील मुले* १) शाश्वत संघवी २) पार्थ नानकर ३) पियुष कुमावत ( निर्मल इंटरनॅशनल) ४) गौरांग पाटील ( कै.पी.के.शिंदे माध्यम. विद्यालय ) ५) आर्यकुमार शेवाळकर ( श्री.गो.से.हायस्कूल)
*17 वर्ष आतील मुली* १) आदिती अलाहित २) हर्षिता कुकरेजा (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल) ३) इशा राठोड (कै.पी.के.शिंदे माध्य.विद्यालय)४) अमृता कोरे (निर्मल इंटरनॅशनल) ५) प्रणवी पाटील श्री.गो.से. हायस्कूल
*17 वर्षे आतील मुले*
१) हर्षवर्धन नागणे २) हर्षवर्धन पाटील ( बुरहाने इंग्लिश मीडियम स्कूल) ३) पार्थ निकम ४) तन्मय नागराणी (निर्मल इंटरनॅशनल स्कूल) ५) हर्ष मिश्रा (न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल)
*19 वर्ष आतील मुली*
१) दीक्षा जमदाडे
२) रोशनी पाटील ( एम.एम. कॉलेज पाचोरा)
३) राधा मोरे
४) अक्षरा परदेशी
५) संगीता पाटील
६) भैरवी सूर्यवंशी (सरदार एस के पवार माध्य. व उच्च माध्य. नगरदेवळा)
19 वर्ष आतील मुले
१) विनीत बागुल
२) कल्पेश महाजन
३) हर्षल चौधरी
४) उमेश भावसार
५) सम्यक चव्हाण (सरदार एस के पवार माध्य. व उच्च माध्य. नगरदेवळा) यांची
जिल्हास्तरावर निवड झाली. या कार्यक्रमास तालुक्यातील शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी.बोरसे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.महेश चिंचोले यांनी केले.