पाचोऱ्यात जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाचे ( कृष्णापुरी ) महामार्गावरील गतिरोधक व इतर मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

पाचोऱ्यात जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाचे ( कृष्णापुरी ) महामार्गावरील गतिरोधक व इतर मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी, पाचोरा यांच्या वतीने जळगाव – चांदवड महामार्गावर भारत डेअरी स्टॉप ते पांडव नगरी पर्यंत शहरातील चौकात तसेच महामार्गाला जे-जे उपरस्ते मुख्य शहरात किंवा कॉलनी मध्ये जाण्यासाठी जोडले आहेत अशा ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी व इतर मागण्यांसाठी दिनांक २५ ऑगस्ट, शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाढती रहदारी व त्यामुळे होणारे अपघात यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांचे अपघातात प्राण गेले आहे व अनेक कत्यऻ तरुणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे.या विषयासंबंधी अगोदर ही अनेक मागण्या तसेच निवेदने प्रांताधिकारी कार्यालय, पाचोरा व सार्वजनिक बांधकाम विभागात दिली गेली परंतु यावर कोणत्याही स्वरूपाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे लाक्षणिक उपोषण करुन यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आमचा लढा तीव्र करु अशा इशारा ही मंडळाने दिला आहे.

प्रमुख मागण्या
१) जळगाव – चांदवड महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवावे
२) गतिरोधक बसवितांना ते वाहतूक नियमाप्रमाणे असावे, त्यावर कलरचा पट्टा व चमकणारे स्टिकर लावले जावे जेणेकरून वाहनचालकांना रात्री लांबुन दिसण्यास मदत होईल
३) महामार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
४) महामार्गावरील पथदिवे रात्रीच्या वेळी नेहमी चालु असावे.