पाचोरा-भडगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी

पाचोरा-भडगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.सौ वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी

पाचोरा-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीचे नेत्या सौ.वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन दिले.गेल्या महिन्याभरापासून पावसाने उसंत दिल्यामुळे बळीराजा संकटात आलेला आहे.त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे.अशीच पावसाने दडी मारली तर येणारा रब्बी हंगाम देखील येईल की नाही याची शाश्वती नाही.बळीराजा हवालदिल झालेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने ताबडतोब पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करुन सर्वतोपरी मदत करावी.या आशयाचे निवेदन आज सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या समवेत मा. प्रांत साहेबांना दिले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख श्री उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख श्री अरुण पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, विलास देवचंद पाटील, डी. एस‌ पाटील, भारत शंकर पाटील, श्री अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, शशिकांत पाटील, धनराज पाटील, अजय पाटील, भरत खंडेलवाल, राजेंद्र राणा, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल,मनोज चौधरी, दादाभाऊ पाटील, नितीन लोहार, आकाश महाजन, निखिल सोनवणे, राजू गायकवाड, गांगुर्डे, पंकज पाटील, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.