पाचोरा पोलीसांची धडकेबाज कारवाई

पाचोरा पोलीसांची धडकेबाज कारवाई

मागील बऱ्याच दिवसा पासून पाचोरा शहरात मोटरसाइकील चोरीचे बरेच गुन्हे दाखल असतांना मा.पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल यांच्या मार्गदर्शन खाली पोना/राहुल सोनवणे,पोना/विश्वास देशमुख, पोना/दीपक सुरवाडे, पोना/विनोद बेलदार असे तपास करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहिती नुसार आरोपी नामे सलमान गुल्लू पिंजारी यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने यापूर्वी माझे मित्र फिरोज पिंजारी शाहरुख शेख शेखलाल व शकूर टकरी फिरोज पिंजारी अशांनी संगनमताने पाचोरा शहरात विविध ठिकाणी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी याचा पोलिसांनी शोध घेतला व आरोपी मजकूर यांना अटक करून तीन दिवसाची पोलिस कस्टडी घेऊन आरोपी मजकूर यांना कडून पाचोरा शहरातील चार मोटारसायकली व औरंगाबाद येथे चोरून आणलेली एक मोटर सायकल जप्त करण्यात आले असून असे पाचोरा पोलिस स्टेशनचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले असून सदर कारवाई मा SP श्री प्रवीण मुंडे ADD SP सचिन गोरे DYSP भरत काकडे तसेच पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी राहुल सोनवणे मल्हार देशमुख दीपक सुरवाडे विनोद बेलदार राहुल बेहरे किरण पाटील होमगार्ड कौतिक पाटील मिलिंद माली यांनी केली आहे__