विज्ञान दिवस (२८ फेब्रु.) निमित्त झेरवाल अकॅडमी येथे २७ फेब्रु. रोजी विज्ञान मेळावा

विज्ञान दिवस (२८ फेब्रु.) निमित्त झेरवाल अकॅडमी येथे २७ फेब्रु. रोजी विज्ञान मेळावा

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा शहरातील नामांकित कोचिंग सेंटर झेरवाल अकॅडेमी यांच्यामार्फत येणाऱ्या २८ फेब्रुवारी विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये डॉ सी व्ही रमण यांच्या जागतिक शोध निमित्त विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी झेरवाल अकॅडमी येथे विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात, त्या अनुषंगाने यावर्षी देखील झेरवाल अकॅडमी येथे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान मेळा चे आयोजन केले आहे.

विज्ञान मेळा
दिनांक: २७ फेब्रुवारी २०२३
वार: सोमवार
वेळ: सकाळी ११ ते दुपारी २
पत्ता: झेरवाल अकॅडमी, जोगेश्वरी कॉलनी, एम एम कॉलेज चौक, भडगाव रोड, पाचोरा.

या विज्ञान मेळाव्यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. कुठल्याही शाळेच्या किंवा कुठल्याही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवता येईल.

यामध्ये विद्यार्थ्यांना मॉडेल किंवा पोस्टर प्रेसेंटेशन करता येईल तसेच विद्यार्थी स्वतः (स्वतंत्र) किंवा ग्रुपमध्ये सहभाग नोंदवू शकतो. प्रत्येक स्वतंत्र किंवा ग्रुप एन्ट्री साठी रुपये 50 इतकी फी घेण्यात येईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतील. तसेच पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल.

पाचोरा शहर तसेच तालुक्यातील विविध शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन झेरवाल अकॅडमीच्या संचालिका प्रा. गायत्री अमोल झेरवाल यांनी केले.