चोपडा महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा समिती मारवड द्वारा कै.नानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालय, मारवड अंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष व महिला गटासाठी दि.१० व ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी ‘आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे होते. दि.१० नोव्हेंबर २०२२ रोजी या स्पर्धेचे उदघाटन डॉ. निर्मल टाटीया यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोप समारंभाप्रसंगी एरंडोल विभागाच्या तसेच महाविद्यालयाच्या ध्वजांचे अवतरण करुन व राष्ट्रगीताने स्पर्धेच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या संपूर्ण स्पर्धांमध्ये स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप पुरुष गटामध्ये अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, भडगाव येथील सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर चोपड्याच्या कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाने विजयश्री प्राप्त केली. त्याचप्रमाणे महिला गटांमध्ये अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, चोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तसेच भडगाव येथील सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाने विजय प्राप्त केला. या मैदानी स्पर्धांमध्ये एरंडोल विभागातील एकूण १६ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत एरंडोल विभाग परिसरातील विविध महाविद्यालयातून खेळाडू मोठया संख्येने सहभागी झाले होते. सदर स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी धनदाई महाविद्यालय, अमळनेर येथील क्रीडा संचालक डॉ.शैलेश पाटील, पंकज महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.व्ही. के.पाटील, मारवाड महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व क्रीडा विभाग एरंडोल विभाग समितीचे सचिव डॉ. देवदत्त पाटील तसेच विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक प्रा. एस.बी.सोनवणे, प्रा.जे.बी. सिसोदिया डॉ.संजय भावसार, प्रा.के.जे वाघ, डॉ. हर्ष सरदार, डॉ. दिनेश तांदळे, प्रा. सचिन पाटील, डॉ. सचिन भोसले, श्री. सचिन पाटील, श्री.प्रेमचंद चौधरी, श्री.अतुल पाटील यांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बहुमोल असे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार जिमखाना विभाग प्रमुख व क्रीडा संचालक सौ.क्रांती क्षीरसागर यांनी केले.
स्पर्धेचे आयोजन व नियोजनासाठी क्रीडा संचालक सौ.के.एस.क्षीरसागर तसेच जिमखाना समिती सदस्य व श्री.रवींद्र पाटील, श्री. सुधाकर बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.