खा.उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमोलभाऊ शिंदे यांच्या दणक्याने व पाठपुराव्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील पोकरा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

खा.उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमोलभाऊ शिंदे यांच्या दणक्याने व पाठपुराव्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील पोकरा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

——————–+++++++———
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचे अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात होणार जमा—
अमोलभाऊ शिंदे यांची माहिती.
—————————–
राज्य शासनाने रु.600 कोटीच्या निधी वितरणास दि.27 जानेवारी 2022 रोजी दिली मान्यता : *लाभार्थ्यांना मिळाला दिलासा*
*अमोलभाऊ शिंदे यांच्या भूमिकेचे कौतुक*
—————————–
पाचोरा — नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावे यासाठी
अमोलभाऊ शिंदे यांनी दि 21 /01/2022 रोजी स्थानिक शेतकऱ्यासह मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांना पाचोरा दौऱ्यावर असतांना निवेदन देऊन सदरच्या विषयाबाबत चर्चा केली होती.
व प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दिनांक : 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत सदरील प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यास घेराव घालण्याचा इशारा दिला होता.
*अमोलभाऊंच्या दणक्याने पोकरा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांनी खा.उन्मेषदादा पाटील व खंबीर भूमिका घेणारे शेतकरी पुत्र अमोलभाऊ शिंदे यांचे कौतुक केले आहे*

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वरदान ठरलेली आहे . माञ सदरील योजनेबाबत शेतकऱ्यांच्या समवेत चर्चा करत असताना असे निदर्शनास आले होते की शेतकरी / शेतकरी गटांना दिलेल्या लाभाच्या अनुदान (उदा. पाईप खरेदी, ठिबक तुषार सिंचन संच खरेदी, फळबाग लागवड, शेडनेट / पॉलिहाऊस उभारणी, मधुमक्षिका पालन, शेततळे इ.) अनुदान मागील ४ ते ५ महिन्यांपासून (डेस्क – ७) मुंबई स्तरावर प्रलंबित असून याबाबत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले होते.
त्याच अनुषगाने गुरुवार दि.27 जानेवारी 2022 रोजी पाठपुरावा करतेवेळी महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प च्या सन 2021-22 करिता रक्कम रु.600 कोटी निधी वितारनास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. यामुळे लवकरच

* भडगाव तालुक्यातील- 205 शेतकरी रू.74.99 लाख व
* पाचोरा तालुक्यातील 880 शेतकरी रू.6 कोटी 45 लाख*
जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

*लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*
गेल्या सहा महिन्यांपासून पोकरा अनुदानासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या लाभार्थ्यांनी अनुदान मिळवण्यासाठी खा.उन्मेषदादा पाटील व अमोलभाऊ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. आज निधी वितरित करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी तातडीने लिंक करून घ्यावे जेणेकरून अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होणार नाही असे आवाहन देखील अमोलभाऊ शिंदे यांनी केले आहे.येत्या पंधरा ते वीस दिवसात लाभार्थ्यांना थेट आपल्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळत मिळणार असल्याने ज्या लाभार्थ्यांनी उसनवारी, व्याजाने पैसे काढून, कर्ज काढून,सोने तारण ठेवून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांना या आदेशाने दिलासा मिळणार असून लाभार्थ्यांनी खंबीर भूमिका घेणारे खा.उन्मेषदादा पाटील व अमोलभाऊ शिंदे यांचे कौतुक केले आहे.