परधाडे येथील आदिवासी युवकांनी घेतली वैशालीताई सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट

परधाडे येथील आदिवासी युवकांनी घेतली वैशालीताई सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट

पाचोरा:- शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांची पाचोरा भडगाव मतदार संघात लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बालकांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.आज परधाडे येथील आदिवासी युवकांनी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेतली. आदिवासी युवकांचा मोठा गट परधाडे येथून आला होता, त्यांनी पाचोरा शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात वैशालीताईंची भेट घेतली.याप्रसंगी पाचोरा शिवसेनेचे युवासेना शहर प्रमुख श्री. मनोज चौधरी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.