चोपडा महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयात स्वयंचलित हजेरी सिस्टीमचे उदघाटन

चोपडा महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयात स्वयंचलित हजेरी सिस्टीमचे उदघाटन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय ग्रंथालायशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून स्वयंचलित हजेरी सिस्टीमचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
ग्रंथालयाचे सर्व कामकाज हे संगणकावर मागील १० वर्षापासून चालू आहे त्याच्या पुढील टप्पा म्हणून आत्ता ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकांची हजेरी ही ग्रंथालयाच्या दारावरच बसविलेल्या मशिनच्या सहय्याने स्वयंचलित पद्धतीचा वापर करून घेण्यात येत आहे. प्रत्येक वाचकाला बारकोड आधारित कार्ड देण्यात आले आहे व त्यावरील बारकोड मशीनसमोर गेला की त्या वाचकाची हजेरी इत्यंभूत माहितीसह सर्वर ला सेव्ह होईल व त्याचे रिपोर्ट जनरेट होतील.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी करून दिले त्यात त्यांनी डॉ.एस.आर.रंगनाथान यांच्या कार्याविषयी व स्वयंचलित हजेरी पत्रक बाबतीत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की “आपल्या महाविद्यालयाचा आलेख सतत चढता आहे. यात आपल्या संस्थापकाचा दृष्टीकोन व मार्गदर्शन महत्वाचे आहे. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. ”
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, “जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे आणि हे स्वयंचलित हजेरी मशीन एक पुढचे पाउल आहे. प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी ग्रंथालयात भेट द्यावी. कारण आपल्या ग्रंथालयात जवळपास ६४००० पुस्तके, १७ प्रकारचे वर्तमानपत्र, ५५ मासिके व जर्नल, इलेक्ट्रोनिक जर्नल, ई-पुस्तके, ई-व्हिडिओ आहेत तरी त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.”
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ, इंग्रजी विभागाचे प्रमुख व आयक्यूएसी समन्वयक डी.एस.पाटील, ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ.डी.पी.सपकाळे, डॉ.ए.एच.साळुंखे, डॉ.आर.आर.पाटील, कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी.पाटील, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे तसेच कस्तुरबा विद्यालयाचे समन्वयक आर.डी. साठे, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एस. सोनवणे, कस्तुरबा विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर, व्ही.सी.पाटील, मनेश देसले, विश्वनाथ पाटील, उमेश नगराळे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी.पाटील यांनी तर आभार रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील अश्विनी जाधव, संदीप बोरसे, शशिकांत चौधरी, पी.जे.बेहेरे व कु. कविता वासनिक यांनी परिश्रम घेतले.