पाचोरा पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा;पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

पाचोरा पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा;पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते महिलांचा सत्कार!

आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉन्स्टेबल प्रकाश पाटील यांनी केले असून अध्यक्ष नजन पाटील यांच्या कडून पोलीस खात्यातील महिलांचा सत्कार सन्मान तसेच समाजातील महत्वाच्या घटकांमध्ये महिलांचा समावेश होत असून यामध्ये महीला वर्गाचा फार महत्त्वाचा वाटा आहे याबाबत पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या कडून कौतुक करत सत्कार करण्यात आला. तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी तालुक्यातील महिला पोलीस पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला असून या कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे,महिला पोलीस हवालदार शारदा भावसार, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, वैशाली मराठे तसेच पत्रकार बांधव व महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती सदस्या प्रा. वैशाली बोरकर मॅडम , प्रा. सुनीता मांडोले मॅडम, दिवटे मॅडम, वर्षा ब्राह्मने मॅडम, संगीता नेवे मॅडम तसेच पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.