पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेत शिक्षकेतर दिन उत्साहात

पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेत शिक्षकेतर दिन उत्साहात

पाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे आज दिनांक 15 नोव्हेंबर हा दिवस “शिक्षकेतर कर्मचारी दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रतिभा परदेशी, प्रां. अंकिता देशमुख, प्रा.संगीता राजपूत, प्रा.प्रतिभा पाटील, श्री अंबालाल पवार, निवृत्ती बाविस्कर, सुरेखा बडे, कल्पना पाटील, श्री विजय पाटील, हेमराज पाटील उपस्थित होते.

विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रा. प्रतिभा परदेशी व अंबालाल पवार यांनी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले. प्रा संगीता राजपूत यांनी व्यवस्थापनातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाचे महत्त्व विशद करताना गोष्टी रूप दाखला दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय पवार यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचे व दिलेल्या जबाबदारीचे मुक्तकंठाने कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक शिवाजीराव बागुल, कनिष्ठ लिपिक श्रीमती कोमल चव्हाण, प्रयोगशाळा परिचर विश्वजीत पवार, सेवक वर्ग अनुक्रमे आबाजी रामराव पाटील, शिवराम सुदाम पाटील, हिरालाल दोधा परदेशी, शकील दगडू खाटीक, धनराज भटू धनगर, राकेश बाळासाहेब पगार यांचा सत्कार झाला. प्रा. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, जयदीप पाटील यांनी आभार मानले.