पाचोरा ‘कृष्णापुरी भागातील मुतारी होणार कधी’ ? परिसरातील नागरिकांची होतेय गैरसोय

पाचोरा कृष्णापुरी भागातील मुतारी होणार कधी?परिसरातील नागरिकांची होतेय गैरसोय.

 

पाचोरा शहरातील विविध विकास कामे झाली त्यात महत्त्वाचा म्हणजे पाचोरा शहराला जोडला जाणारा कृष्णापुरी भागातील हिरवा नदी वरचा पूल झाल्यामुळे या भागतील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. परंतु याठिकाणी पूर्वीपासून असलेली एक सार्वजनिक मुतारी रस्त्याच्या कामामुळे तोडण्यात आली असून पुन्हा मात्र ती बांधण्यात आली नाही. स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मुतारी नसल्याने गौरसोय झाली असून पुलाच्या पूर्ण झालेल्या कामानंतर प्रशासनाने याठिकाणी मुतारी बांधण्यासाठी लक्ष दिले नसून याबाबत नागरिकांकडून नाराजीचा सुरू प्रशासना बाबत बघण्यास मिळाला आहे. सदर परिसरात आठवडा बाजार नियोजित असल्यामुळे बाहेर गावाहून येणारे भाजी विक्रेते व नागरिक खुल्या जागेवर लघुशंखा करतात बाजार असल्यामुळे मुळे महिला वर्गाची याठिकाणी वर्दळ असते. स्थानिक महिलांना या लाजिरवण्या प्रकारास समोर जावे लागत असून स्थानिक नगरपालिका प्रशासनाने सदर विषय गांभीर्याने घेऊन विषय मार्गी लावण्याबाबत स्थानिकांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.