मुरूमाचे डंपर सोडवण्यासाठी पाथर्डीच्या प्रांत कार्यालयातील कारकून मॅडम साठी 3000 रुपयाची लाच स्वीकारताना दलाल जगताप याला रंगेहाथ पकडले 

मुरूमाचे डंपर सोडवण्यासाठी पाथर्डीच्या प्रांत कार्यालयातील कारकून मॅडम साठी 3000 रुपयाची लाच स्वीकारताना दलाल जगताप याला रंगेहाथ पकडले

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अवैध रित्या मुरूमाची वाहतूक करणाऱ्या डंपरला तहसीलदार यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पाथर्डीच्या प्रांत कार्यालयातील कारकून मॅडम यांनी सदर डंपर बायइज्जत बरे होउन शिक्कामोर्तब करण्यासाठी नेमलेल्या दलाला मार्फत ३००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे . याबाबतची माहिती अशी की पावणे दोन वर्षांपुर्वी दिनांक ३०/७/२०२३ रोजी डंपरने मुरुमाची अवैधरित्या तस्करी करताना शेवगाव पोलिसांनी एका डंपरला रस्त्यावर रंगेहाथ पकडून शेवगाव येथील तहसीलदार यांच्या कडे पुढील कार्यवाही साठी दिले होते. शेवगावचे तहसीलदार यांनी सदर वाहनांची तपासणी करून त्याने अवैधरित्या तस्करी केलेल्या मुरुमाची किंमत पाहून त्या डंपर मालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून २ लाख ३६ हजार ३०० रुपयाचा दंड केला होता. पावणे दोन वर्षे होऊन ही दंड न भरला म्हणून शेवगावचे तहसीलदार यांनी सदर डंपर लिलावात काढून दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.दिनांक २५ मार्च २०२५ रोजी सदर डंपर मालकांनी सरकारी चलनाद्वारे दंडात्मक रक्कम २,३६,३०० रुपये सरकारी तिजोरीत जमा केले होते.त्या नंतर शेवगाव तहसीलदार यांनी सदर डंपर वाहन सोडविण्यासाठीचे आदेश होण्यासाठीचे पत्र वरीष्ठ उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग पाथर्डी यांना दिले होते.सदर डंपर वाहन सोडविण्यासाठी चे अंतिम आदेश होण्यासाठीचा सदर प्रस्ताव पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. खाजगी इसम अभिषेक दत्तात्रय जगताप हा दलाल तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडविण्यासाठीचे अंतिम आदेश देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय माळी बाभुळगाव,पाथर्डी येथील कारकून मोडसे मॅडम यांच्या साठी ७५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार दिनांक ३/४/२०२५ रोजी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ४/४/२०२५ रोजी लाच मागणीची पडताळणी केली होती.लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी खाजगी इसम अभिषेक दत्तात्रय जगताप यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे डंपर वाहन सोडविण्यासाठी चे अंतिम आदेश देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथर्डी येथील कारकून मोडसे मॅडम यांच्या साठी ७००० रूपयाची मागणी केली होती.व त्या पैकी ३००० रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली.दिनांक ४/४/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तहसीलदार कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता दलाली करणारा संशयित आरोपी अभिषेक दत्तात्रय जगताप यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडविण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून ३००० रूपयाची लाच स्वीकारताना दलाल अभिषेक जगताप याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३७५/२०२५ प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक कलमाखाली ७(१) नुसार आरोपी जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक, राजू आल्हाट साहेब, सापळा परीवेक्षण अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे साहेब, यांच्या नेतृत्वाखाली महीला पोलिस हवालदार राधा खेमनर, पोलिस नाईक चंद्रकांत काळे,चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड, यांच्या सहकार्याने आणि नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे -वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी, किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फोन नंबर ०२४१/२४२३६७७ किंवा १०६४ या नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.पोलीसांच्या नावाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ही या जगताप नावाच्या दलालांनी चांगलाच धुडगुस घातला आहे.त्यांना पाथर्डी पोलिसांनी वेसन घालणे अत्यंत गरजेचे आहे.