श्री सु .भा .पाटील प्रा.विद्यामंदिर येथे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश सप्ताह साजरा

श्री सु .भा .पाटील प्रा.विद्यामंदिर (सकळ सत्र) येथे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या सप्ताह साजरा

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु .भा .पाटील प्रा.विद्यामंदिर (सकळ सत्र) येथे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या सप्ताह साजरा करण्याच्या उद्देशाने वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या विचार सरणीनुसार …… शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. जीवन जगत असतांना….वृक्षाचा प्राणवायू (ऑक्सिजन) म्हणून श्वसनासाठी होणारा अत्यंत महत्वाचा उपयोग…त्याचप्रमाणे वृक्षाचे कल्पवृक्ष म्हणून पान, फुल,फळ,खोड ,मुळं,इ..प्रत्येक अवयवाचे महत्त्व तसेच औषधी उपयोग याबद्दल अत्यंत सोप्या शब्दात माहिती दिली….त्याचप्रमाणे झाडे लावा- झाडे जगवा…आणि त्यांचे संवर्धनही करा.अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी श्री.सु. भा.पाटील विद्यामंदिरा पासुन ते हुतात्मा स्मारकापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक परदेशी सर उपस्थित होते.