लोककला राहत कोष च ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतां साठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा माला चे वितरण करण्यात आले

लोककला राहत कोष च
ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतां साठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा माला चे वितरण करण्यात आले लोककला राहत कोष चे उद्घाटन सकाळी चाळीसगांव येथे मा. दिलीप चव्हाण(संचालक, साद फाउंडेशन) यांच्या हस्ते झाले तसेच पाचोरा येथे मा. खलील देशमुख यांच्या हस्ते लाभार्थीना लोककला राहत किट वाटप करण्यात आले या उपक्रमा अंतर्गत चालीसगांव भड़गाव पाचोरा या तीन तालुक्यातील विविध लोककला प्रकारातील 90 गरजु लोककलावंत यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे
या कठीण काळात ज्या लोकांची उपजीविका हि केवळ लोककले वर आधारित आहेत अशा अनेक कलावंता वर उपासमारीची वेळ आली आहे मागील वर्षभरापासून मुख्य उत्पन्नाचे साधनच जवळ जवळ बंद झाले आहेत तसेच मायबाप सरकार जी काही मदत जाहीर करते त्यात हा संपूर्ण समुदाय नेहमी उपेक्षितच राहतो आम्ही ग्राम स्वराज समिती आणि निरुती लोकाआर्त यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला राहत कोष या उपक्रमाची सुरवात करत आहोत या अतंर्गत गरजू लोककलावंता साठी महिन्याकाठी लागणारा किराणा आपण मदत म्हणून देत आहोत सद्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यामधील एकूण ९० लोककलावंत याना आपण लोककला राहत कोष या उपक्रमा अंर्तगत मदत करत आहोत. लाभार्थी निवडताना आपण पुढील पैकी निकष समोर ठेवत आहोत
१] सदर लाभार्थी हा भूमिहीन असावा
२]त्यांची उपजीविका हि लोककला सादरीकरणावर आधारित असावी अथवा त्यांच्या उत्त्पन्ना चे मुख्य साधन लोककला सादरीकरन हे असावे
३]जेष्ठ नागरिक असल्यास प्राधान्य
वरील निकष नुसार एकूण ९० लाभार्थी आहेत आपण प्रती लाभार्थी महिना सरासरी १५०० रुपये इतक्या किमतीचा किराणा माल पुरवणार आहोत . यात दैनदिन आहारा साठी लागणार्या साहित्याचा अंतर्भाव आहे यात एक लाभार्थी १५०० रुपये या प्रमाणे एकूण ९० लाभार्थी साठी १,३५,००० रुपये इतका खर्च आहे
आम्ही आरंभीलेल्या या मदत कार्यात आपण योग्य ती मदत करावी हि विनती ग्राम स्वराज समिती आणि निऋति लोकार्ट यांच्या मार्फ़त करण्यात आली आहे
लोककला राहत कोष एक उपक्रमाचे समन्वयक म्हणून कल्पतेश देशमुख हे काम पाहत आहे तसेच ग्राम स्वराज समिती चे अध्यक्ष मा. शंकर बगाड़े व विश्वस्त मा.डॉ. सुगन बरण्ठ यांच्या मार्गदर्शन लाभत आहे.मा चंद्रकांत ग्रोगरी यानी यांस मोलाचे अर्थ सहाय्य केले आहे तसेच विजया ठाकुर, सागर नागणे, सचिन आग़ोने, लोककालवंत प्रकाश वाघ, शाहिर परशुराम सुर्यवंशी, मोरसिंग राठोड यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे