पाचोरा पीपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पाचोरा पीपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पाचोरा, प्रतिनिधी पाचोरा येथील पीपल्स बँकेतर्फे दरवर्षी सभासदांच्या अडी अडचणी तसेच विविध विषयावर चर्चा करण्याकरता सभासदांना आमंत्रित करून त्यांची प्रश्न जाणून घेण्याकरिता तसेच काही सूचना असल्यास ऐकून घेण्याकरिता बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ हजर असतात यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या हितासाठी व सभासदांच्या हितासाठी जे योग्य निर्णय व जनहिताचे असते त्याकरिता विविध विषयावर चर्चा केली जाते यावेळी सभासदांतर्फे श्री व्ही. टी. जोशी, सर श्री सिताराम पाटील सर, श्री गोविंद महाले, श्री राजु बाळदकर, प्राध्यापक सी. एन. चौधरी सर यांनी विविध विषय मांडून विचार मांडले बँकेच्या दरवर्षी होणारा विद्यार्थ्यांकरिता बक्षीस वितरणाचा विषय सभासदांना डिव्हीडंट नौकर भरती विषयावर चर्चा झाली असता बँकेचे चेअरमन श्री अतुल संघवी यांनी उत्तर देताना सांगितले यावर्षी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात येईल तसेच सभासदांना डिव्हीडंट लवकरच चालू होईल तसेच लवकर भरती संदर्भात लवकरच जाहिरात काढली जाईल तसेच कुठलेही काम असो पारदर्शी ठेवण्यात येईल बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रशांत अग्रवाल यांनी बँकेच्या हितासाठी व्यापारी यांनी सहकार्य करावे असे सांगितले बँक ही आपलीच आहे यावेळी बँकेचे सर्व संचालक व मॅनेजर हजर होते. बँकेचा सर्व लेखाजोखा चेअरमन श्री अतुल संघवी यांनी मांडला आभार सौ अस्मिता ताई पाटील यांनी मांडला.