जळगाव जिल्हा दुध संघाच्या प्रशासक पदी अमोल शिंदे यांची निवड

जळगाव जिल्हा दुध संघाच्या प्रशासक पदी अमोल शिंदे यांची निवड

————————————————————
पाचोरा व भडगाव तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव

पाचोरा-
येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांची जिल्हा दूध संघावर प्रशासक म्हणून निवड करण्यात आली असून या संदर्भात राज्याचे उपसचिव यांनी आदेश पारित करून नवीन प्रशासक नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अमोलभाऊ शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलताना सांगितले की माझे नेते मा.मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी मला हा सु:खद धक्का दिला असून वरिष्ठांनी दाखवलेला विश्वासास नक्की पात्र ठरून,स्वतःच्या परिवाराचा मुख्य पारंपारिक व्यवसाय हा दूध व्यवसाय असल्याने त्या अनुभवाचा नक्कीच जिल्हा दूध संघाच्या प्रगती व विकासासाठी उपयोग करेल व मा.मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी विश्वासाने दिलेल्या संधीचे सोने करेल.असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले.व याप्रसंगी त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे व खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व शुभेच्छुकांचे देखील आभार व्यक्त केलेत.