चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

 

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे दि. ०८ एप्रिल रोजी एक दिवसीय राष्ट्रीय हँड्स-ऑन workshop on Arduino and it’s Robotic applications या कार्यशाळेचे आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते तसेच उदघाटक म्हणून रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. एन. सी. अहिरराव. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. अलिझाड, माजी इलेक्ट्रॉनिक्स प्रमुख प्रा. श्यामभाई गुजराथी, प्राचार्य डॉ. डी ए सूर्यवंशी, उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.ए.एल.चौधरी आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत भारतातील विविध राज्यातील वेगवेगळ्या कॉलेजमधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले असे एकून ६८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांनी केले. त्यांनी सांगितले की, कार्यशाळेचे आयोजन म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योजक यांच्यासाठी एक मंच असून या मंचावर त्यांच्या विविध नवनवीन संकल्पनांना चालना देण्यासाठी चर्चा करण्यात येते. प्रत्येक क्षेत्रात सध्या रोबोटचा वापर येऊ घातलेला आहे. विद्यार्थ्यांना रोबोटिक्स साठी लागणारी प्रोग्रामिंगची किती गरज आहे व त्या विषय या कार्यशाळेत शिकविले जाईल. या कार्यशाळे मुळे विद्यार्थ्यांना रोबोट तयार करतांना आत्मविश्वास वाढेल.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे रोबोट कसा तयार केला जातो याचा अनुभव मिळेल व स्वतः तयार केलेल्या रोबोटमुळे विद्यार्थ्यांचा आनंद, उत्साह व आत्मविश्वास वाढेल. जग जस जसे पुढे जात आहे त्या मार्गाने आपण ही गेले पाहिजे रोबोट चा वापर वैद्यकीय क्षेत्रात ही केला जात आहे. मेंदूची शस्त्रक्रिया रोबोट च्या सहाय्याने केली जातात. आजचा उपक्रम खुप सुंदर आहे. विद्यार्थ्यां मध्ये विज्ञाना विषयी अधिक आवड निर्माण होईल तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा वापर करून नव नवीन प्रयोग केले पाहिजे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक जीवनात विज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.

प्रा. डॉ. एस. एस. अलिझाड यांनी मार्गदर्शनात सांगितले की, विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळेची गरज आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाची दिवसेंदिवस होणारी प्रगती विषयी विस्तृत माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स विभागाने आयोजित केलेला आजचा उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या बुध्दिक विकासासाठी महत्त्वाचा आहे व इलेक्ट्रॉनिक्स विभाग अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात अग्रेसर असते असे सांगितले.

याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रा.डॉ.ए. एल.चौधरी, डॉ. के.डी. गायकवाड, डॉ.एल.बी. पटले व सौ पुनम गाडगीळ यांनी लिहिलेल्या इलेक्ट्रॉनिक विषयाच्या क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये पहिल्या टेक्निकल सत्रात डॉ. के.डी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना Arduino, Microcontroller, सेंसर या विषयी पी पी टी दाखवून रोबोट तयार करण्यासाठी ची प्रोसेस समजावून सांगितली.

दुसऱ्या टेक्निकल सत्रात डॉ.एल.बी. पटले यांनी प्रत्यक्ष रोबोट कसा तयार करावा व त्यासाठी लागणारे साहित्य, त्याची जोडणी तसेच प्रोग्रामिंग कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या सेन्सर चा वापर करून रोबोट तयार केले व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवली. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास संधी मिळाली व ज्ञानात वाढ झाली.

या टेक्निकल सत्रात माजी इलेक्ट्रॉनिक्स प्रमुख प्रा. श्यामभाई गुजराथी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटची पाहणी केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात अशा प्रकारच्या कार्यशाळांची आवश्यकता आहे व इलेक्ट्रॉनिक्स विभाग असे कार्यक्रम घेत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यशाळेचे आयोजनासाठी प्रा. डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.डी.गायकवाड, डॉ.एल.बी. पटले, सौ. पुनम गाडगीळ, निशा पाटील, रोहन सोनवणे, धीरज राठोड, व्ही.एम.शुक्ल व टी.वाय.बीएस्सीचे विद्यार्थी इत्यादींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम गाडगीळ यांनी केले तर डॉ. एल. बी. पटले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.