पाचोरा तालुक्यातील मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न 

पाचोरा तालुक्यातील मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न

अंतुर्ली :- पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु. येथे आज दि. 30 जुलै 2023 रोजी सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली भव्य मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन गावातील नागरिकांसाठी सकाळी 8:00 ते 12:00 वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले. गावातील अधिकाधिक नागरिकांनी या रक्त तपासणी शिबिराचा फायदा घेतला. याप्रसंगी भिकन पाटील, दामोदर निकम, शुभम महाजन, भावेश पाटील, दादाभाऊ पाटील, रघुनाथ पाटील, भगवान पाटील, समाधान कुंभार, हिरामण पाटील, सुभाष पाटील, धनसिंग पाटील, भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, पांडुरंग पाटील, डीडी नाना, प्रेम निकम, रघुनाथ पाटील, पवन पाटील आणि भूषण धनगर शिवसेना (उ बा ठा) पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.