नांद्रा माध्यमिक विद्यालयात ॠणानुबंध कार्यक्रम संपन्न

नांद्रा माध्यमिक विद्यालयात ॠणानुबंध कार्यक्रम संपन्न

गुरूंनी दिले शिष्यांना स्नेहभोजन नांद्रा ता. पाचोरा ( वार्ताहर)-

येथे धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर संचलित.अप्पासाहेब पी एस पाटील माध्य. विद्यालय नांद्रा येथे ॠणानुबंध गुरुशिष्य स्नेहमिलन सोहळा सन १९७६ ते१९८२ चे विद्यार्थी व सन १९९१-९२ ची 10 वी ची बॅच यांचा संपन्न झाला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश डब्लू.एस. पाटील सर,देठे सर व महेश गवादे सर यांच्या संकल्पनेतून शालेय परिसरात वृक्षारोपण व घनवन प्रकल्पांतर्गत केलेली वृक्षलागवड दाखवणे हा होता.हि वृक्ष लागवड व हा घनवन प्रकल्प माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वर्गणीतुन करण्यात आला आहे.यासाठी डब्लू.एस.पाटील सरांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एस पाटील सर होते.तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सतिषचंद्र काशीद, महेश गरुड हे होते.
कार्यक्रमाचे आयोजन मा.मुख्या. डब्लु एस पाटील व एल एन देठे सर यांनी केले होते. कार्यक्रमास जेष्ठ संचालक यु यु पाटील.माजी मुख्या. एस एस पाटील, एस टी पाटील. ,माने एस आर पाटील सर,वाणी सर, भोई सर
स्थानिक सल्लागार समिती चे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील. उपाध्यक्ष विश्वनाथ लोटन पाटील.सदस्य विनोद बाबुराव पाटील. भारत धनसिग पाटील.
विनोद तावडे.पोपा किरण तावडे.
गणेश पाटील कुरंगी,किरण तावडे पोलिस पाटील,वाल्मिक पाटील सरपंच पहाण, प्रमोद पाटील पहाण,लक्ष्मण पाटील आसनखेड ,प्रत्रकार राजु पाटील,प्रा.यशवंत पवार,नगराज पाटील कुरंगी मुख्याध्यापक आर एस चौधरी पर्यवेक्षक एस व्ही शिंदे.व शिक्षक व सर्व काही कर्मचारी वृंद,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान दत्त गुरू, सरस्वती देवी व आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पूजनाने झाली.
आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला.
सन1991-92 च्या 10 वी चे विद्यार्थी व गड्या आपला गाव बरं यांच्या वतीने डब्लु एस पाटील व देठे सर यांचा सपत्नीक शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चौधरी यांनी केले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती सांगुन वातावरण बदलुन टाकले. शाळेतील दिवस आठवतांना प्रत्येकजण भाऊक होत होता.मनोगत बी.जी पाटील सेवानिवृत्त उपअभियंता जळगांव, प्राचार्य एन.ए.पाटील डी. डी.एस.पी. महाविद्यालय एरंडोल,पी डी साखरे सेवानिवृत्त शिक्षक कल्याण, अशोक रमेश सपकाळे विद्युत वितरण जळगांव. यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या वतीने विनोद पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
शिक्षकांच्या वतीने माजी शिक्षक वाणी सर यांनी मत व्यक्त केले.
माजी मुख्या. डब्लु. एस.पाटील यांनी बदलती शिक्षण पद्धत्ती आजचा शिक्षक व विद्यार्थी यावर परखड मत व्यक्त केले.आज शिक्षक व समाज यांची दरी वाढत आहे. समाजाने शाळेचा भाग व्हावा व शाळेनेही समाजाचा भाग व्हावा.तरच समाजाचा विकास श्यक्य आहे.प्रत्येकानेच वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे, आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा सत्कारणी लावावा असे मत त्यांनी मांडले.संस्थेचे सचिव मा.काशीद यांनी आचार्य बापु साहेब यांच्या सहवास लाभलेले शिक्षक व त्यांच्या कार्याचा गौरव केला.प्रत्येकाने आपल्या मनोगतात गुरु-शिष्य यांच्या संबंधावर उजाळा टाकला.
माजी विद्यार्थी पी.डी.साखरे यांनी पाच हजार रु धनादेश तर काहींनी रोख रक्कम श्री. डब्लू. एस.पाटील सरांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठाकूर यांनी केले.
आभार पर्यवेक्षक शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री महेश गवादे सर, प्रशांत चौधरी सर,अनिल खैरनार, रामभाऊ सोनवणे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,भगिनी वसतिगृह अधिक्षक,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी स्नेहभाजनाचा आनंद घेतला.