पाचोऱ्यात अरिहंत नगर, आदर्श नगर,मल्हार नगर, खंडेराव नगर आणि प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

पाचोऱ्यात अरिहंत नगर, आदर्श नगर,मल्हार नगर, खंडेराव नगर आणि प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी. प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कॉलनी वासियांकडून साजरी करण्यात आली.संध्याकाळी प्रभागातील सर्व शिवप्रेमी नागरिक एकत्र आले येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात अमलात आणून जीवन जगावे अशा पद्धतीचा संकल्प आज शिवप्रेमी नागरिकांनी केला. या कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनासाठी श्री गजू पाटील व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.