कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे पालक-शिक्षक सभा खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न

दरवर्षी प्रमाणे कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे पालक-शिक्षक सभा खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न….

पाचोरा प्रतिनिधी गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.पि‌.के.शिंदे पुनगाव रोड येथे शिक्षक-पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेला पालक -शिक्षक 150 ते 200 पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.व्ही.गीते सर होते.प्रास्ताविक डी.आर.कोतकर सर यांनी केले.सूत्रसंचालन हेमंत टोणपे सर यांनी केले कार्यक्रमात पालकांच्या संख्येचे समाधान होईपर्यंत पालकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात आले.पालक-शिक्षक सभेच्या चर्चेमध्ये पर्यवेक्षक आबा पाटील सर, पी.बी.राठोड सर, आर.बी.धोबी सर, श्रीकांत नागणे सर, श्रीमती सुषमा पाटील मॅम इत्यादी शिक्षक सहभागी झाले होते अध्यक्षीय भाषणात गीते सर यांनी सांगितले की तुमच्या सर्व समस्या 100% सोडवण्याचा प्रयत्न राहील. पालकांनी मात्र अधून मधून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कसा उंचावला जाईल याकरिता आपण स्वतः सुद्धा प्रयत्न करावेत.असेही शेवटी ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.आभार प्रदर्शन श्रीमती ताड मॅम यांनी केले.