अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा तर्फे राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार

अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ तर्फे राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार

पाचोरा ( प्रतिनिधी )

जालना येथे अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघतर्फे गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा २०२२ संपन्न झाला असून या सोहळ्यात पाचोरा येथिल विश्वकर्मा शेती अवजार व उद्योग चे संचालक राजेंद्र भास्कर लोहार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राजेंद्र लोहार यांनी कमीतकमी खर्चात पावर टिलर तसेच शेतीला लागणारे अवजारे कमीत कमी खर्चात उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी राजाला परवडणारे यंत्र बनवत खूप मोठा दिलासा दिला होता यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला.महासंघाचे अध्यक्ष श्री सदाशिवराव हिवलेकर तसेच निवृत्त जिल्हाधिकारी भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.