नांद्रा माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९९.०९ टक्के

नांद्रा माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९९.०९टक्के

नांद्रा(ता.पाचोरा)ता.२ येथील आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा २०२३चा निकाल ९९.०९टक्के लागला असून एकूण ११२विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.त्यापैकी ११०विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
यात *प्रथम क्रमांक* बाविस्कर घनश्याम वसंत (नांद्रा) यास 94.80%
*द्वितीय क्रमांक* कु.महाले मयूरी समाधान (पहाण)93.20%, *तृतीय क्रमांक* कू.पाटील वैष्णवी आप्पा(कुरंगी) हिस 92.80%, *चौथा क्रमांक* कु.पाटील स्नेहल रावसाहेब (कुरंगी) हिस 92.40% तर *पाचवा क्रमांक* कु.कोळी पल्लवी अशोक (कुरंगी) हिस 92.20%गुण मिळाले विशेष म्हणजे सामनेर केद्रातुन 94.80%गुण मिळवून बाविस्कर घनश्याम वसंत याने केंद्रातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेंदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासाहेब श्री संजय गरूड, सचिव दाजीसाहेब सतीशचंद्र काशीद, संचालक श्रीमती उज्वलाताई सतीश काशीद, सहसचिव भाऊसाहेब दिपक गरुड, वसतिगृह अधीक्षक भाऊसाहेब श्री कैलास देशमुख , स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष दादासाहेब डॉ. वाय.जी.पाटील, उपाध्यक्ष बापूसाहेब विश्वनाथ सुर्यवंशी यांच्या सह स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर.एस.चौधरी सर, पर्यवेक्षक एस. व्ही.शिंदे सर, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री चंदन पाटील, श्री आर.व्ही.सपकाळे यांच्या सह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.