शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात

शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात

पाचोरा – गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई) पाचोरा, येथे दिनांक 28 फेब्रुारी 2024 रोजी विज्ञान दिनाच्या निमित्ताने “विज्ञान प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले होते. सुमारे 350 विद्यार्थ्यांनी विविध विषयावरील वैज्ञानिक प्रयोग या प्रदर्शनात सादर केले.

गिरणाई संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे सर तसेच आदर्श प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ पूजाताई अमोल शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते डॉक्टर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित महिला पालक व सौ. पूजाताई शिंदे यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर प्रदर्शनामध्ये 350 पेक्षा जास्त विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सोलर, हायड्रो पॉवर, सी.एन.जी. गॅस, जलसंधारण, माहिती तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर आकर्षक असे प्रोजेक्ट बनवून आणले होते.

विशेशतः पूर्व प्राथमिक ( pre primary) विभागाच्या चिमुरड्या मुलांनी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यात त्यांनी गणित, विज्ञान ,पर्यावरण, सारख्या विषयांचे प्रतिकृती व मॉडेल्स बनवून आणले होते.तत्पूर्वी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी डॉ. सी. व्ही .रमण यांच्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. व स्वतःविद्यार्थ्यांना एक प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर विज्ञान प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट प्रथम, द्वितीय ,तृतीय उपक्रमांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूल चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विशेषतः विद्यालयातील विज्ञान शिक्षक व पालक बंधू भगिनींनी अथक परिश्रम घेतले.