गो.पु.पाटील,महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

_गो.पु.पाटील,महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान….!!!_

*कोळगाव (भडगाव) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव,येथे महाराष्ट्र शासनातर्फे २०२२/२३ मध्ये घेण्यात आलेल्या विविध शासकीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुनिल पाटील,स्थानिक शाळा समिती सदस्य युवराज पाटील,संभाजी देसले,प्रवीण पाटील,माजी सरपंच अनिल बिऱ्हाडे,शरद पैलवान,बापू पैलवान,भगवान माळी आदि उपस्थित होते.
महाविद्यालयातील धीरज पाटील,कृष्णा पाटील,जय बिऱ्हाडे,अक्षय माळी,एकनाथ धनगर,अमन पिंजारी,निखिल देसले,गौरव भदाणे,निकेश कोळी,प्रणव गोसावी,गोपाल गावंडे,पायल पाटील,पायल सोनवणे,भाग्यश्री पाटील,वर्षा पाटील,ऐश्वर्या पाटील,नम्रता हिरे,गायत्री सोनवणे,भाग्यश्री पवार,विशाखा महाजन,हर्षदा पाटील,सुप्रिया पाटील आदि खेळाडूंनी जिल्हास्तरीय,विभागस्तरीय तथा राज्यस्तरीय विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य पणाला लावून यश संपादन केल्याबद्दल त्यांचा पदक,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील आदिंनी कौतुक करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी तर आभार मनोज पवार यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

(फोटो caption – खेळाडूंसोबत संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,रघुनाथ पाटील,बी.डी.साळुंखे,मनोज पवार,प्रा.प्रेमचंद चौधरी व इतर मान्यवर )