जि.प.शाळा नवागांव (बुडकी) येथे वुक्षरोपन कार्यक्रम संपन्न

जि.प.शाळा नवागांव (बुडकी) येथे वुक्षरोपन कार्यक्रम संपन्न

शिरपुर : तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथील जिल्हा परिषद शाळेत दि :२२/७/२०२३ रोजी विश्व मंडळ सेवाश्रम शिरपुर, लोकमंच सेवामंच शिरपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वुक्षरोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला….
कार्यक्रमात जि.प.शाळा शाळा नवागांव येथुन मुख्य गाव प्रवेशद्वारापासून ते होळी मैदान, संपूर्ण गावात जनजागृती व वुक्षरोपनाचा संदेश देत झाडे जगवा, झाडे जगवा, एक मुल, एक झाड, लावा हो लावा, झाडे लावा तसचे विविध घोषणा वाक्य देऊन रॅली काढण्यात आली त्या नंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थाना राजेश पावरा सर (सटिपाणी) यांनी वुक्षरोपनाचा बद्दल माहिती व मार्गदर्शन केले.
विश्व मंडळ सेवाश्रम शिरपुर व लोकमंच शिरपुर तर्फे शिरपुर तालुक्यात प्रत्येक गाव-पाड्यासाठी स्वता जाऊन या वर्षी ३ हजार वुक्षरोपन उपलब्ध करून देऊन लोकांना व जनजागृती करुन वुक्षरोपन लागवड करण्याचे आवाहन करुन गावत वुक्षरोपन करण्यात आले….
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मोते सर यांनी केले..
या वेळी :- राजेश पावरा सर, भाईदास पावरा,शामराल पावरा, जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता), अनिल पावरा, जयदास पावरा, किसन पावरा, बन्सीलाल पावरा, शिकाल्या पावरा, संजय पावरा सर, शिरसाठ सर, तसचे शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.