पाचोर्यात तीन मजली इमारत कोसळली :जीवीत हानी नाही

पाचोर्यात तीन मजली इमारत कोसळली :जीवीत हानी नाही

पाचोरा (प्रतिनिधी) – बांधकाम करतांना गेल्या पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहील्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही

शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणुन तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती मात्र या इमारतीच्या पावसाने तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती. रिमझिम चालणाऱ्या पावसाने आज रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषद ने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. इमारत कोसळली चा व्हिडिओ सोशल मीडिया वर जोरात व्हायरल होत आहे