पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर.एल पाटील यांची बिनविरोध निवड

पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर.एल पाटील यांची बिनविरोध निवड

पाचोरा (प्रतिनिधी)
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे दि. 29 मार्च रोजी पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची निवडणूक घेण्यात आली.
पतपेढीचे माजी अध्यक्ष व जिल्ह्याचे जेष्ठ नेते संभाजी पाटील ,जिल्ह्याचे जेष्ठ नेते यु.यू.दादा पाटील हे या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पतपेढीचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते प्रमोद गरुड, माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष आर.जी. पाटील , जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक भावेश अहिराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणी निवडीचे सर्वाधिकार प्रमोद गरुड यांना देण्यात आले होते.
उपाध्यक्ष पी.सी. पाटील माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी, श्रीमती यु.जी.कदम समाज विकास विद्यालय शिंदाड,चिटणीसपदी संदीप पाटील ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे., संघटक चिटणीसपदी रत्नराज साळुंखे माध्यमिक विद्यालय साजगाव,क्रीडाचिटणीस एस. के.पाटील माध्यमिक विद्यालय खाजोळा,कोषाध्यक्षपदी वीरभूषण सोनवणे महात्मा फुले हायस्कूल भोजे, यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीच्या सदस्य पदी सौ.ज्योती ठाकरे गो.से. हायस्कूल पाचोरा, श्रीमती सुषमा पाटील पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा, श्रीमती. मनीषा शिवनारायण जाधव एस. के. पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा, यशवंत गांगुर्डे माध्यमिक विद्यालय सामनेर,योगेश ठाकूर एस.के.पवार हायस्कूल नगरदेवळा,रेहान खान उर्दू हायस्कूल पाचोरा, प्रमोद मधुकरराव गरुड माध्यमिक विद्यालय खडकदेवळा, रवींद्र गंभीरराव पाटील तावरे कन्या विद्यालय पाचोरा, मनोहर नानाभाऊ देसले गो.से. हायस्कूल पाचोरा या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
. तालुक्यातील विविध शाळा व संघटनांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.