तिस वर्षाचा प्रदिर्घ राजकीय अनुभव असणाऱ्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली जाण्याने नगर जिल्ह्याच्या राजकारणाला मोठा फटका बसला : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 

तिस वर्षाचा प्रदिर्घ राजकीय अनुभव असणाऱ्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली जाण्याने नगर जिल्ह्याच्या राजकारणाला मोठा फटका बसला : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) तिन दशकांचा खुप मोठा प्रदिर्घ राजकीय अनुभव असणाऱ्या भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली जाण्याने नगर जिल्ह्याच्या राजकारणाला फार मोठा फटका बसला आहे असे उदगार माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी काढले.ते अहिल्या नगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आणि राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते प्रसार माध्यमा समोर बोलत होते.माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे म्हणाले की कर्डिले यांच्या पहाटेच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद घटना आहे. कर्डिले साहेब हे जरी माझे राजकिय विरोधक असले तरी सामान्य जिवनात वैयक्तिक कटुता त्यांनी कधीही बाळगली नाही.सुमारे ३० वर्षाचा त्यांचा राजकीय अनुभव होता.ईतक्या अनुभवी नेत्यांच्या जाण्याने नगर जिल्ह्याचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे.जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही.सर्वांना समान संधी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबीले होते.कर्डीले साहेब यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब,त्यांचे नातेवाईक,आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्या सर्वांना खूप मोठे दुःख त्यांच्या अशा अकाली जाण्याने झाले आहे.या दुःखाच्या प्रसंगांमध्ये आमचे तनपुरे कुटुंब सर्व कर्डिले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.त्यांच्या कर्डिले कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याच बळ मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो अशी श्रद्धांजली प्राजक्त तनपुरे यांनी अर्पण केली. आजकाल राजकारणात राजकीय विरोध करताना किती टोकाची कटुता निर्माण होते पण एकमेंकांनी राष्ट्रीय एकात्मतेची आपली पायरी कधीच ओलांडली नाही. अशा या राजकिय धुरंधर दिवंगत नेत्यांना राज्य आणि जिल्हा पत्रकार संघटणांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.