धुळे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंडे साहेब गुन्हेगारांचे व अवैध धंदे करणाऱ्यांचे कर्दनकाळ

धुळे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंडे साहेब गुन्हेगारांचे व अवैध धंदे करणाऱ्यांचे कर्दनकाळ

(पाचोरा प्रतिनिधी:- अनिल आबा येवले)

नुकतेच नाशिक येथून धुळे येथे प्रमोशनल बदली होऊन पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झालेली श्री संजय बारकुंडे साहेब गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरत असून गुन्हेगारांनी आपले बस्तान आवरून चांगल्या मार्गाला लागत आहे श्री संजय बारकुंडे साहेब यांनी *नाशिक येथे दोन वर्ष पोलीस उपयुक्त पदी नियुक्ती झालेली होती* त्यांनी त्या दोन वर्षाच्या काळात नाशिक शहरात गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना वटणीवर आणले होते अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आले होते त्यात त्यांनी चोऱ्या, खून, दरोडे , चैन स्नेकिंग सारखे अशे अनेक मोठे गुंन्हे उघडकीस आणले आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक शहरात राजकीय असो की कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार असो कारवाई करताना भेदभाव केला नाही होते तसेच शिस्त लावण्याचे त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या काळात नाशिक मधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतेच त्यांचे पोलीस उपायुक्त पदावरून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती धुळे येथे होतात त्यांनी सर्वप्रथम सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना केले की पोलीस स्टेशनला आलेले ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मान दिला पाहिजे आलेल्या नागरिकांचे तक्रारीचे निवारण करून त्यांना न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय बारकुंडे साहेब यांनी धुळे जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर अवैध धंदे व गुन्हेगारावर कारवाई करून आपले वचक निर्माण केलेतसेच धुळे येथील चोऱ्या घरफोड्या रात्रीची पेट्रोलिंग साठी त्यांनी स्पेशल गस्ती लावलेली असून तशा त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिलेली असून त्यांनी शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम करीत आहे नुकतेच त्यांनी दोन दिवसापूर्वी उज्जैन येथून धुळे रस्त्याच्या महामार्गावर अडवणूक व दगडफेक करून लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीसांनी जेरबंद करून त्यांना अटक करण्यात आली तसेच धुळे जिल्हा येथे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना सूचना व योग्य मार्गदर्शन माहिती प्रसारित करून पोलीस भरतीसाठी येणाऱ्या मुलांना राहण्याची व्यवस्था व खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व करून पारदर्शक कारभार ठेवण्यासाठी त्यांनी योग्य सूचना केली आहे त्यांच्या या चांगल्या कल्पना बद्दल त्यांचे खरोखर अभिनंदन होत असून त्यांच्या या चांगल्या उपक्रमात सर्वत्र अभिनंदन होत आहे🌹