गोराडखेडा येथे सय्यद जलालुद्दीन बुखारी उर्स साजरा

गोराडखेडा येथे सय्यद जलालुद्दीन बुखारी उर्स साजरा

गोराडखेडा येथे मशहूर सूफी बुजूर्ग सय्यद जलालुद्दीन बुखारी यांच्या उर्स साजरा आला. या दिवशी अनेक श्रद्धालू यांनी दर्गाला भेट देऊन आपली उपस्थिती नोंदवली. वर्षान वर्ष सय्यद जलालुद्दीन यांच्या ऊर्स साजरा केला जातो. या सुफी लोकांनी ईश्वर पर्यंत पोहोचण्याच्या भक्तीचा मार्ग लोकांना दिला, समाजाचे विविध जाती धर्म व पंथ चे लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकात्मता, बंधुत्वता,अखंडता निर्माण केली. याच कारणाने हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक मोठी संख्या मध्ये त्यांचे अनुसरून करतो. या दिवशी दर्गाह कमेटीचे सदस्य सय्यद शकील कादर, सय्यद जलील करीम, सत्तार जाफर, मजीद अकबर, मुश्ताक अश्रफ,दर्गाह मशीदचे इमाम हाफीज मोहसीन यांच्या हस्ते दर्गावर चादर चढवण्यात आली. उरस शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहायता केली. गोरारखेडा खुर्द व बुद्रुक ग्राम पंचायत सदस्य व पोलीस पाटील संजू पाटील व चंदू पाटील यांनी सहकार्य केल्याने त्यांचा दर्गाह कमिटी मार्फत आभार व्यक्त करण्यात आला.