पाचोरा युवासेना तर्फे जिल्हा परिषद शाळेत कन्या दिवस निमित्ताने खाऊ चे वाटप

पाचोरा येथे युवासेना तर्फे जिल्हा परिषद शाळेत कन्या दिवस निमित्ताने खाऊ चे वाटप

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने जागतिक कन्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून जागतिक कन्या दिवस साजरा केला
यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी सांगितले की मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आपण आज येथे मुलींना खाऊचे वाटप केले हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण याच हेतूने आपण काम करत आहोत यापुढे देखील आपण काम करत राहणार आहे. यावेळी युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन तालुका
प्रमुख भूपेश सोमवंशी शहर प्रमुख हरीश देवरे
शहर संघटक प्रशांत सोनार गणेश बडगुजर adv गौरव पाटील यांच्यासह मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, शिक्षक डॉ वाल्मीक अहिरे ,आर डी पाटील शिक्षिका सौ आशा जाधव , सौ मीना हिवरे , युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते