सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे शालेय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे आयोजन

सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे शालेय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा शहरातील सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरजू ,होतकरू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप समारंभ आयोजित करण्यात आला असून यासाठी संस्थेच्या वतीने 23 जुलै रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता शहरातील सू.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा. येथे प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाघ, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, वासुदेव महाजन, जगदीश सोनार, वाघ डेअरीचे चे संचालक विकास वाघ, सुजित तिवारी, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, मुख्याध्यापक अशोक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेश वाटप समारंभ आयोजित केला असून उपस्थिती आव्हान संस्थेचे रोशन कुमार शर्मा, .मधुकर महाजन, विठ्ठल महाजन, संजय कुलकर्णी, सागर थोरात, विशाल थोरात तसेच सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देविदास थोरात यांनी केले आहे.