स्वराज्य पोलीस मिञ पञकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना,चोपडा तर्फे तहसिलदार व गट शिक्षणाधिकारींना पञकान्वे मागणी

स्वराज्य पोलीस मिञ पञकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना,चोपडा तर्फे तहसिलदार व गट शिक्षणाधिकारींना पञकान्वे मागणी…

आदिवासी भागातील जि.पं.तसेच आश्रम शाळा तेथील शिक्षक शासकीय वेळेवर न येणाऱ्यांवर कारवाई करणे….

चोपडा प्रतिनिधी :

स्वराज्य पोलीस मिञ पञकार संरक्षण आणि माहीती अधिकार संघटना,संस्थापक तथा अध्यक्ष दिपक काबळे तसेच संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश(देवा)शेवाळे व विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य संघटक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव हेमकांत गायकवाड यांच्या नेतृत्वात,माहीती अधिकार व पञकार संरक्षण संघटना शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिनांक १९ जानेवारी गुरुवार रोजी चोपडा येथील तहसिलदार व गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती चोपडा यांना तालुक्यातील आदिवासी भागातील जि.प.तसेच आश्रम शाळा येथे कार्यरत असलेले शिक्षक मनमानी व्यवहार करत असून तासिका वेळेवर न होणे,केव्हाही येणे,केव्हाही जाणे.शासकीय वेळेचे भान नसणे,मुख्यध्यापाक वर्गाचा शैक्षणिक शाळेवर योग्य तो ताबा नसणे,शाळेतील यंत्रणेवर शिस्त नसणे,यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अशा प्रकारचे गंभीर चित्र दिसून येत आहे.तरी ही परस्थितीत योग्यरीत्या सुधारली नाही तर शिक्षकांवर योग्यरित्या शासकीय नियमानुसार कार्यवाही करावी.अन्यथा संघटनेतर्फे आमरण उपोषण पुकारण्यात येईल असे आव्हान संघटनेतर्फे करण्यात आले आहे.सदर निवेदन देण्या प्रसंगी सुनिल पावरा तालुका अध्यक्ष,हेमकांत गायकवाड जिल्हा सचिव,मन्सुर तडवी जिल्हा संपर्क प्रमुख,संदिप कोळी तालुका उपाध्यक्ष,मिलिंद वाणी तालुका उपाध्यक्ष,रमजान तडवी तालुका संघटक,रविंद्र कोळी तालुका संघटक,बाळु कोळी सदस्य,विनायक पाटील सदस्य उपस्थित होते.