पाचोऱ्यात शिवसेना व धनुष्यबाण गोठविणान्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध

पाचोऱ्यात शिवसेना व धनुष्यबाण गोठविणान्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध….!

शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध

पाचोरा : ( प्रतिनिधी )

पाचोरा शहरात आज वैशालिताई यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग विरोधात मोर्चा निवडणूक आयोगाने घाईघाईने आमच्या पक्षाचे नाव ” शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण” गोठविले. वास्तविक आमच्या पक्षाचे आवश्यक ती माहिती वेळेच्या आत निवडणूक आयोगाकडे पोहचवली होती व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती केली होती. परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेवून आमच्या पक्षाचे नाव “शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण” गोठविले त्याबद्दल पाचोरा भडगांव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध करतो. त्याच वेळी ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ४० सहकाऱ्यांचा जाहिर धिक्कार करतो. महाराष्ट्राचा विकासासाठी गोरगरीबांच्या कल्याणासाठी हिंदुत्वाचा रक्षणासाठी, शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान करुन प्रतिकुल परिस्थीतीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करुन महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली ती शिवसेना संपविण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनताजनार्दन त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापाप आहे. छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राची भुमी पापांन्या क्षमा करणार नाही. पुनश्चः या निकालाचा जाहिर निषेध करतो, आमचा भावना शासन दरबारी कळवाव्यात हि नम्र विनंती.यावेळी जिल्हा प्रमुख दीपकसिंग राजपूत,शेतकरी जिल्हा प्रमुख अरुण पाटील,शेतकरी तालुका प्रमुख रमेश बाफना,उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील,उपजिल्हा समव्यक जे.के.पाटील,शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील,शहर प्रमुख शंकर मारवाडी,उपजिल्हा युवा सेना प्रमुख माधव जगताप,उपजिल्हा युवा सेना प्रमुख संदीप जैन,तालुका युवा प्रमुख रविंद्र पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील आदी असंख्य शिव सैनिक व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता उपस्थित होते.