राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त कु धनश्री पाटील हीने मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे व्यक्तिचित्र रेखाटले
ज्ञानाचा दिवा घरोघरी लावूया,
अंधश्रद्धेचे जाळे कायमचे तोडूया…
विज्ञानाच्या बळावर प्रगतीचे स्वप्न पाहूया,
चला, समृद्ध भारताचे भविष्य घडवूया!
आपल्या शाळेतील इ. 9वी ‘क’ ची विद्यार्थिनी
कु धनश्री विजय पाटील हिने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पेन्सिलीतून रेखाटन साकारले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने भारताचे नाव जगात अजरामर केले आहे.
*चांद्रयान आणि मंगलयान: या मोहिमांच्या यशानंतर भारत आता ‘गगनयान’ मोहिमेद्वारे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे.विज्ञान हा ‘ज्ञानाचा साठा’ आहे आणि वैज्ञानिक हा तो साठा शोधणारा ‘शोधक’ आहे.
तो शोधक बनविण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य आमचे विज्ञानाचे शिक्षक शिक्षिका करत असतात.
विज्ञान म्हणजे केवळ सिद्धांतांचा संच नसून ती एक शोध घेण्याची दृष्टी आहे आणि शिक्षक तो दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारा दुवा असतो.
विद्यार्थ्याना विज्ञानातील विविध संकल्पना सोप्या भाषेत मांडणारे, मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलन करून विज्ञानाची कास धरण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व विज्ञान शिक्षक बंधू-भगिनींना
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या प्रसंगी मुख्याध्यापक एन. आर ठाकरे सर, उप मुख्याध्यापक आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षक – सौ.अंजली गोहील मॅडम, आर बी. तडवीसर, आर बी. बांठीयासर सांस्कृतिक प्रमुख महेश कौडिन्यासर,
किमानकौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, प्रितम पाटील सर,
श्रीमती. संगीता वाघ मॅडम,सौसुखदा पाटील मॅडम, श्रीमती वनिता जगताप मॅडम, धीरज विसपुते सर, सुहास बागुल सर, अरुण कुमावत सर,सुबोध कांतायन सर मनोहर देसले सर, प्रमोद पाटील सर या सर्व उपस्थितांनी कु.धनश्री च्या चित्राचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.























