मा.वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात बैलपोळा सण उत्साहात साजरा…!

मा.वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात बैलपोळा सण उत्साहात साजरा…!

 

 

 

 

पाचोरा:-

 

भारतीय संस्कृतीतील कृषिप्रधान परंपरेचे द्योतक आणि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सोबती असलेल्या बैलांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे पोळ्याचा सण. तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात हा पारंपरिक सण उत्साह, आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 

या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते बैलांची पूजा करून या सणाचे औचित्य साधण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनातील नित्यसाथीदार असलेल्या बैलांचा गौरव आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या परंपरेची, संस्कृतीची ओळख चिमुकल्यांना व्हावी, या उदात्त हेतूने शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निरागस हसऱ्या चेहऱ्यांनी पोळ्याचा आनंद लुटला.

 

विशेष आकर्षण म्हणजे पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी सजवलेल्या बैलगाडीत बसून केलेला आनंदोत्सव. लहानग्यांच्या खळखळून हसण्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

 

याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. फरीदा भारमल, सौ. वर्षा पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.